चांदण्यांच आभाळ घेऊन ...
चंद्राला कवेत बांधुन ..
तुझ्या अंगणाशी उतरलेली अल्लड रात्र,
तुझ्या गालावर रुळणाऱ्या ..
तुझ्या बटेला कुरवाळीत ...
तुला जोजवू लागते
तु मात्र ...
मिठीत घट्ट पकडलेला ...
नाजुकसा टेडी घेऊन ...
ओठांचा चंबु करुन ....
स्वप्नातच हसत असतेस ...
कुणाला बघत असतेस कोण जाणे ...
तुझ्या अंगाखांद्यावरून फिरणारी
ति लबाड झुळूक ...
तुला थोड्याश्या गुदगुल्या करते
आणि, मग ...
तुझ्या बदलणाऱ्या कुसेसोबत ...
रात्रही थोडी दचकते ...
......
मी त्याच खोलीत एका कोपऱ्यात ..
खिडकीजवळ उभा राहुन हे सगळ बघत असतो ....
भिंतीवर हार घातलेला तुझ्या आईचा फोटो उचलतो ...
आणि ...
ओठातुन निघणारा सिगारेटचा धुर ...
सरळ त्या रात्रीत पसरवुन देतो ...
अश्या बऱ्याच रात्री अजुन बाकी आहेत ....
संतोष (कवितेतला)
No comments:
Post a Comment