क्षितिजावरती ओझरणारी तांबुसलेली रेघ
पश्चिमेस हुरहुरतो आहे एक सावळा मेघ
त्या मेघाचा हुंकार पसरतो गगनाच्याही पार
अन् निशा वेंधळी हळू उघदते काळोखाचे दार
मी स्तब्ध उभा राहून पहातो अंधाराचे लेणे
मागे उरल्या, तांबुसवेड्या नक्षत्रांचे देणे
जुन्या हिशोबांची बरकत मग कवितांवरती येते
शब्दांवरचे मखमल मोती उघड पसरूनी देते
रात्र जराशी गडद होत जाताना म्हणते ओवी
आरोहांचे - अवरोहांचे किती खुलासे ठेवी ?
रात्रीचे, माझे, कवितांचे जुने असावे नाते
मी लिहितो तेव्हां रात्र नेहमी शब्द स्पर्शुनी जाते
संतोष (कवितेतला)
No comments:
Post a Comment