Saturday, June 1, 2013

जन्मांतर

जन्मांतर ठरलं आहे आपल्या दोघांमधे
कित्येक वळणांचं,
सरळ - तिरक्या रेघांचं ..
आणि,
अनेक भिन्न श्वासांचं ...
तरीही एकच असतो आपण ...
नेहमीच जवळ ... निदान मनांनी तरी ..
अथवा कसे जगलो असतो?
चकवे देत स्वतःच स्वतःला ..
किती खोल रुजलो असतो?
असुदेत जन्मांतर असंच ..
कृष्णाचं होतंच ना? मीरेसोबत ..
किंवा हृदयाचं जसं असतं .. श्वासांसोबत ...
तेच तर आहे आपल्या दोघांना ...
अजुन एकत्र ठेऊन ... "जन्मांतर"

संतोष (कवितेतला)

तुझी खुप आठवण येते बाबा ....

कालच्या फोटोत पाहिला तुला ...
डोळ्याखालची वर्तुळं आणखीणच गडद होत चालली आहेत ...
तरीही हसताना दिसतोस ...
चंदेरी रेघांनी व्यापत चाललेले तुझे केस,
आणि, हळुहळू सुरकुत्यांच्या आड लपत चाललेला तुझा चेहरा ...
काहीतरी बदलतंय नक्की ...
नक्की मला दूर जाऊन खुप दिवस झालेत, कि
तुला कधी निरखुन बघीतलंच नाही कधी मी ...
.
.
तुझी खुप आठवण येते बाबा ....

संतोष (कवितेतला)